एक्सप्रेस वेवर स्टेअरिंगवरच हार्ट अटॅक, हॅण्डब्रेक दाबून जीव सोडला

मुंबईहून पुण्याकडे जाताना तानाजी खाडे कार चालवत होते. परंतु घाट परिसरात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली.

एक्सप्रेस वेवर स्टेअरिंगवरच हार्ट अटॅक, हॅण्डब्रेक दाबून जीव सोडला

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाताना एका कार चालकाला स्टेअरिंगवरच हृदयविकाराचा झटका आला. मात्र प्रसंगावधान दाखवून त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र चालकचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तानाजी खाडे असं चालकाचं नाव असून ते 45 वर्षांचे होते. ते मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहत होते.

मुंबईहून पुण्याकडे जाताना तानाजी खाडे कार चालवत होते. परंतु घाट परिसरात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली. चढणावरुन गाडी मागे येऊ नये म्हणून हॅण्डब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. पुढील काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV