मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

हो असा... आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक लागत नायत... तर रस्तो शोधूक लागतो... चंद्रावरचे खड्डेही ज्याच्यासमोर फिके पडतले असो हो रस्तो... आणि हो रस्तो जोडतो कोणत्या शहरांका? तर आर्थिक राजधानी मुंबईक आणि पर्यटन राजधानी गोव्याक.

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा... आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक लागत नायत... तर रस्तो शोधूक लागतो... चंद्रावरचे खड्डेही ज्याच्यासमोर फिके पडतले असो हो रस्तो... आणि हो रस्तो जोडतो कोणत्या शहरांका? तर आर्थिक राजधानी मुंबईक आणि पर्यटन राजधानी गोव्याक.

पनवेल ते माणगाव... काही विचारु नका राव... एकदा प्रवासाला निघालं.. की लोक घरी सिंगल पीसमध्ये परत येतले की नाय... त्याचो कायक नेम नाय... हमरापूर ते नागोठाणे म्हणजे विच्चारु नका.... कासवाशीही शर्यत लावलास... तरी कासव जिंकतलं...

कधी तरी ऐकला होता... हो रस्तो म्हणे चौपदरी होतलो... त्या मेल्या रस्त्याचे 4 पदर कधी होतले मायत नाय... पण हयसर सगळ्या प्रवाशांची रोजच्या रोज चार-चार हाडं हलतत... बाप्पा तुझे भक्त आणि आमचे सगेसोयरे... हयसूनच गावाकडे येतले... तेव्हा काळजी घे रे बाबा...

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV