रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्रातून तब्बल 2 लाख चोरांना पकडलं!

महाराष्ट्रातून 2 लाख 23 हजार चोरांना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे.

रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्रातून तब्बल 2 लाख चोरांना पकडलं!

मुंबई : भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलाने केलेल्या कामगिरीत रेल्वेतील सामानाची चोरी करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे.

एकट्या महाराष्ट्रातून 2 लाख 23 हजार चोरांना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशामधून 1 लाख 22 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे.

रेल्वेतल्या प्लेटस्, तारा, बाथरूमचे फिटिंग्ज, पंखे, टॉवेल, ब्लँकेट अशा सामानाची चोरी करताना आरपीएफने चोरांना पकडलं आहे. काही महाभाग चोरांनी काही दिवसांपूर्वी तेजस एक्सप्रेसचे नळही गायब केले होते.

दरम्यान, रेल्वेच्या लोखंडी ब्रेक ब्लॉकची चोरी वाढल्याने रेल्वेने त्या जागी फायबरचे ब्लॉक लावण्यास सुरूवात केली आहे. अशीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Railway police arrested 2 lakh thieves from Maharashtra latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV