मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा कहर, विजेचे सहा बळी

पावसामुळे गावांचं मोठं नुकसान झालं असून एकट्या अपसिंगा गावातील जवळपास 500 घरावरची पत्रे उडून गेले आहेत.

By: | Last Updated: 16 Apr 2018 12:03 AM
मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा कहर, विजेचे सहा बळी

उस्मानाबाद : मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. उस्मानाबादेतल्या तुळजापूर तालुक्यातल्या 4 गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. तर मराठवाडा आणि विदर्भात मिळून पावसाने सहा जणांचा जीव घेतला आहे.

पावसामुळे गावांचं मोठं नुकसान झालं असून तुळजापूर तालुक्यातल्या एकट्या अपसिंगा गावातील जवळपास 500 घरावरची पत्रे उडून गेले आहेत. तर लातूरमध्ये वीज पडून एका शेतकऱ्यासह तीन जनावरं दगावली आहेत. दुसरीकडे नांदेडमध्येही वीज पडून 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.या पावसाचा शेतीलाही मोठा फटका बसला आहे. आंबा आणि केळीच्या फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर टोमॅटोचा खच होऊन मोठं नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने लातूर, सोलापूर, नांदेड आणि उस्मानाबाद भागात येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरखेड, यवतमाळ, दारव्हा, बोरी या भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. महागाव तालुक्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rain in Marathwada and vidarbha heavy loss for farmers
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV