जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढली : राज ठाकरे

जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढत असल्याचं मत राज ठाकरेंनी नोंदवलं. सांगलीत पार पडलेल्या पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात ते बोलत होते.

जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढली : राज ठाकरे

सांगली : आजचे साहित्यिक सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर ठोस भूमिका घेत नाहीत, अशी थेट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. सांगलीत पार पडलेल्या पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात ते बोलत होते.  जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढत असल्याचं मतही त्यांनी यावेळी नोंदवलं.

राज्यातली शहरं बळकावली जात आहेत आणि आपआपल्या जाती, धर्माचे मतदारसंघ बळकट केले जात आहेत. पण महाराष्ट्रातली जनता सध्या बेसावध असल्याची भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात जे घडत आहेत, त्यावर लिहिण्याचे धाडस लेखक करत नाहीत. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यातली सामाजिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे या सगळ्या जातीय भिंती पाडा, आणि महाराष्ट्रवर जी संकटे येत आहेत, त्याला सामोरे जाण्यास तयार राहा" अशी सूचनाही राज ठाकरेंनी यावेळी दिली.

विशेष म्हणजे, कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणावरुनही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

“कमला मिल्स अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेले फक्त गुजराती समाजाचे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी ट्वीट करुन शोक व्यक्त केला. वास्तविक, पंतप्रधान आता फक्त गुजरातचे नाहीत हे त्यांनी ध्यानात घ्यावं,” असा खोचक टोला राज ठाकरेंनी हाणला.

भाजप सरकारच्या कारभाराचाही राज ठाकरेंनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. “राज्यात शेतकरी आत्महत्यावर कुणी काही बोलत नाही. महाराष्ट्र नोकऱ्या आहेत, पण त्याही परप्रांतीय नोकऱ्या घेऊन जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही मुंबई-बडोदा रस्त्यासाठी काही कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं. पण त्यांना महाराष्ट्र दिसला नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या सांगली दौऱ्यात पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं. यावेळी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपाधिक्षक दीपाली काळे यांच्यावर कारवाईसाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी कोथळे कुटुंबियांनी राज ठाकरेंकडे केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: raj thakreay on koregaon bhima riots latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV