...तेव्हा भाजपला दुर्बीण लावूनही मित्र सापडणार नाहीत : राजू शेट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्याचा खर्च कमी करून सॅटेलाईट सोडावं, राजू शेट्टींचं आवाहन

By: | Last Updated: 03 Oct 2017 05:18 PM
...तेव्हा भाजपला दुर्बीण लावूनही मित्र सापडणार नाहीत : राजू शेट्टी

कोल्हापूर : भविष्यात भाजपला दुर्बिणीने शोधून पण मित्र पक्ष सापडणार नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.

राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. परंतु जनता त्यांना कधी वनवासात पाठवेल हे सांगता येत नाही. त्यावेळी मित्र कोण येणार, त्यावेळी त्यांना दुर्बीण लावून देखील मित्र सापडणार नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्याचा खर्च कमी करून सॅटेलाईट सोडावं. यामुळ शेतकऱ्यांना हवामानाची योग्य माहिती समजेल. मोदींचा एखादा परदेश दौरा कमी होईल. पण शेतकऱ्यांच भलं होईल.”, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तर कर्जमाफीची शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अपमान योजना असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: BJP raju shetti भाजप राजू शेट्टी
First Published:

Related Stories

LiveTV