इंदापूरमध्ये बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांकडून हत्या

इंदापूरमध्ये बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांना भर चौकात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

इंदापूरमध्ये बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांकडून हत्या

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील नीरा-नृसिंहपूर येथे बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांना भर चौकात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल (गुरुवार) दुपारी तीनच्या सुमारास गावातील चौकात हा प्रकार घडला.

हत्येनंतर आरोपी वडील फरार असून याप्रकरणी वडिलांबरोबर पीडित मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराप्रकरणी अल्पवयीन आरोपीची कोर्टानं जामीनावर सुटका केली होती. त्यानंतर आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांनीच हत्या केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

अल्पवयीन आरोपी आणि पीडित मुलगी हे एकमेकांचे नातलग असून ते शेजारीचे राहत होते. पीडित मुलीने १० एप्रिल २०१७ रोजी आरोपी तरुण आणि श्रीकांत घळके या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली होती त्यानंतर श्रीकांत घळके आणि अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती.

यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला तात्काळ जामीन मिळाला होता. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिचे वडील यांचा त्याच्यावर राग कायम होता. त्यामुळेच आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला इंदापूर येथे शिक्षणासाठी पाठवलं होतं.

दरम्यान, त्याची परीक्षा संपल्याने तो काल (गुरुवार) दुपारी ३ वाजता घरी आला. हातपाय धुण्यासाठी तो आतल्या खोलीत गेलेला असताना त्यावेळी पीडीत मुलगी आणि तिचे वडील कोयता घेऊन त्याच्या घरात घुसले. यावेळी आरोपीच्या आई-वडिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेनं आणि तिच्या वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांवरही कोयत्यानं वार केले.

ही झटापट पाहताच आरोपी मुलानं घरालगतच्या दुकानाच्या शटरमधून पळ काढत गावातील मुख्य रस्त्यावरील चौकात धाव घेतली. यावेळी पीडित मुलीनं आणि तिच्या वडिलांनी त्याला चौकातच गाठलं आणि कोयत्यानं वार करत त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिचे वडील फरार झाले. या संपूर्ण प्रकारमुळे इंदापूरमध्ये खळबळ माजली आहे. सध्या पोलीस हल्लेखोर आरोपींचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV