रिपब्लिकन पक्षच स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ शकतात : श्रीहरी अणे

“खरंच जर भाजपला वेगळे राज्य द्यायचे असेल, तर विदर्भाचा प्रस्ताव याच बजेट सेशनमध्ये आणावं लागेल. नाहीतर ते शक्य नाही.”, असेही श्रीहरणी अणे म्हणाले.

रिपब्लिकन पक्षच स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ शकतात : श्रीहरी अणे

नागपूर : काँग्रेस आणि भाजप दोघेही वेगळे विदर्भ राज्य देऊ शकत नाहीत. जर वेगळा विदर्भ कुणी देऊ शकतं, तर ते म्हणजे रिपब्लिकन पक्ष, असे वक्तव्य विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी केले आहे.

श्रीहरी अणे हे ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाच्या पहिल्या वर्धापन दिनी बोलत होते. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. ‘विदर्भ मिरर’ हे साप्ताहिक खास श्रीहरी अणे यांच्या प्रेरणेतून वेगळ्या राज्याच्या लढ्याला मदत म्हणून सुरु करण्यात आले आहे.

“खरंच जर भाजपला वेगळे राज्य द्यायचे असेल, तर विदर्भाचा प्रस्ताव याच बजेट सेशनमध्ये आणावं लागेल. नाहीतर ते शक्य नाही.”, असेही श्रीहरी अणे म्हणाले.

या वर्धापन दिनी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेस आणि भाजप दोघेही वेगळे राज्य देणार नाहीत. कारण शेवटी विदर्भ ही त्यांच्यासाठी दुभती गाय आहे.”

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Republican Parties can give Vidarbh State, Says Shreehari Ane
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV