न्यू ईयरची पार्टी, चिकन आणि मटणवर ताव

नागरिकांनी तासनतास रांगेत थांबून मटण आणि चिकनची खरेदी केली. तर मुंबईत मासे घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं.

By: | Last Updated: 31 Dec 2017 10:24 PM
न्यू ईयरची पार्टी, चिकन आणि मटणवर ताव

कोल्हापूर/मुंबई : 31 डिसेंबर निमित्त कोल्हापुरात मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी तासनतास रांगेत थांबून मटण आणि चिकनची खरेदी केली. तर मुंबईत मासे घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं.

मुंबईकर दरवर्षी 31 डिसेंबर निमित्त मासे आणि चिकन घेण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी करतात. मात्र यावेळी बऱ्याच जणांनी बाहेरगावी जाऊन किंवा रेस्टॉरंटमध्ये जल्लोष करण्याचा बेत आखलेला दिसतोय. त्यामुळे मच्छिमार्केटमध्ये म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही.

शनिवारी बेंचमार्क नाशिक विभागातून 84 रुपये प्रतिकिलो या दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांची विक्री झाली. ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी गेल्या काही वर्षांत प्रथमच 31 डिसेंबर नफ्याचा ठरला. आनंद अॅग्रो समुहाचे उप महाव्यवस्थापक डॉ. मोहन गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईसाठी जवळपास 1600 टन तर उर्वरित राज्यासाठी 900 हजार टन अशी 2500 टन मालाची विक्री झाली. "

मुंबईतील जोरदार मागणीमुळे शनिवारी दुपारपर्यंतच बुकिंग पूर्ण झालं होतं. काही ठिकाणी तर मनुष्यबळाअभावी बुकिंग रद्द करावं लागलं, इतका मागणीचा जोर होता, असंही मोहन गिरी म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rush in chicken and fish market
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: chicken Meat चिकन मटण
First Published:
LiveTV