वेल प्लेड, लवकरच भेटू, बीडच्या जबरा फॅनला सचिनचं आश्वासन

बीडचे राजूदास राठोड केबीसीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांना सचिनबाबत प्रश्न विचारण्यात आला. मी सचिनचा सर्वात मोठा चाहता आहे. या प्रश्नाचं उत्तर चुकूच शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

sachin give promise to meet his fan rajudas rathore who participated in KBC

मुंबई : बीडच्या राजूदास राठोड यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीमध्ये प्रश्नांना सडेतोड उत्तर देत 25 लाख रुपये जिंकले. यामध्ये राजूदास यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना अवघ्या काही सेकंदाचा वेळ घेत त्यांनी अचूक उत्तर दिलं.

सचिनला वेगवान गोलंदाज बनायचं होतं. त्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज डेनीस लिली यांच्याकडे प्रशिक्षणाची मागणी केली. मात्र तू फलंदाजीवर लक्ष दे, असं म्हणत त्यांनी सचिनला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण देण्यास नकार दिला. याबाबतचा प्रश्न राजूदास यांना विचारण्यात आला होता.

जेव्हापासून क्रिकेट कळायला लागलं तेव्हापासून सचिनचा चाहता आहे. सचिन खेळायला येणार असेल तर सामना सुरु होण्याच्या अगोदर एक तासापासूनच बसायचो. सचिनने सगळ्यात जास्त आनंद दिला आहे. आणि दुःखही त्यानेच जास्त दिले आहेत. मुलीला कार्टून पाहायचे होते आणि मला क्रिकेट पाहायचं होतं. तर त्यावेळी रागात रिमोट फोडला. सचिनला एकदा भेटण्याची इच्छा आहे, असं राजूदास राठोड म्हणाले.

सचिननेही या चाहत्याची इच्छा पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. ‘वेल प्लेड राजूदास राठोड, तुमच्या गप्पा ऐकून चांगलं वाटलं. अपेक्षा आहे तुम्ही आणखी रिमोट फोडणार नाही. लवकरच भेटू, असं आश्वासन सचिनने दिलं आहे.

कोण आहेत राजूदास राठोड?

राजूदास राठोड हे बीड जिल्ह्यातील असून ते शिक्षक आहेत. त्यांची पत्नी अश्विनी राठोडसह ते केबीसीमध्ये सहभागी झाले होते. राजूदास राठोड एका ऊसतोड कामगार कुटुंबातील आहे. सामाजिक कार्यातही त्यांचा तेवढाच सहभाग आहे. गावातील ऊसतोड कामगाराच्या 30 मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या राहण्याची-खाण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sachin give promise to meet his fan rajudas rathore who participated in KBC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा : सुभाष देशमुख
सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा : सुभाष देशमुख

सोलापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडे आठ लाख

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017

  प्रतिबंधित कीटकनाशकं विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा,

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून दूर ठेवल्यानं महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून दूर ठेवल्यानं महसूल राज्यमंत्री...

  यवतमाळ : मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळच्या दौऱ्यात आज मानापमान

आजपासून हार, फुलं स्वीकारणार नाही, पंकजा मुंडेंची भावनिक फेसबुक पोस्ट
आजपासून हार, फुलं स्वीकारणार नाही, पंकजा मुंडेंची भावनिक फेसबुक...

बीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी आजपासून आपण हार, फुलं

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला 16 वर्षांनी तुरुंगवास
महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला 16 वर्षांनी तुरुंगवास

मुंबई : आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी सिद्ध

नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

नागपूर : नागपुरात दोन गटांत मध्यरात्री तुफान हाणामारी झाली. यात

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मनमाड : मनमाडच्या तळेगांव भामेर गावात नरभक्षक बिबट्याच्या

नागपुरात जुगारी काँग्रेस नगरसेवकाला दुसऱ्यांदा अटक
नागपुरात जुगारी काँग्रेस नगरसेवकाला दुसऱ्यांदा अटक

नागपूर : नागपूरमध्ये चक्क काँग्रेस नगरसेवकालाच जुगार खेळताना

विषारी फवारणीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री यवतमाळला
विषारी फवारणीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री यवतमाळला

यवतमाळ : बंदी असलेली कीटकनाशकं कुणाकडे सापडत असतील, तर अशी व्यक्ती

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017 एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि