‘साईंच्या खोट्या पादुका घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार’

साईबाबांच्या खोट्या पादुका आणि खोटी नाणी घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरेंनी दिली.

‘साईंच्या खोट्या पादुका घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार’

शिर्डी : खोट्या पादुका व खोटी नाणी घेऊन देशभर भ्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून साईंच्या खोट्या पादुका आणि खोटी नाणी घेऊन फिरणाऱ्यांच्याबद्दल साई संस्थानकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यावर तपासासाठी साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त मोहन जयकर, बिपीन कोल्हे यांची समिती नेमली होती.

या समितीचा अहवाल नुकताच साई संस्थानच्या बैठकीत देण्यात आला. त्या आधारे खोट्या पादुका आणि खोटी नाणी घेऊन देशभर फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

त्याशिवाय, साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट चालवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sai Temple Trust To Take Action On People Practising Fake Paduka And Coins Of Sai Baba
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV