एक दिवसही शाळेत न गेलेल्या आर्चीला दहावीत 66.40 टक्के

एक दिवसही शाळेत न गेलेल्या आर्चीला दहावीत 66.40 टक्के

सोलापूर : " 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. वर्षभरात शैक्षणिक अडथळ्यांवर मात करुन आर्चीने यंदा दहावीची परीक्षा दिली होती.

रिंकूला दहावीच्या परीक्षेत 66.40 % गुण मिळाले आहेत. आर्चीचा  "मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंंग्रजीत सांगू का" हा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्याच आर्चीला इंग्रजीत 59 गुण मिळाले आहेत.

आर्चीची गुणपत्रिका

  • मराठी 83

  • हिंदी 87

  • इंग्रजी 59

  • गणित 48

  • विज्ञान 42

  • समाजशास्त्र 50


एकूण 332 , 66.40 टक्के

सैराट सिनेमामुळे रिंकू राजगुरु लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. चाहत्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे ती दहावीच्या वर्गातच बसू शकली नव्हती. तिने 17 नंबरचा फॉर्म भरुन दहावीची परीक्षा बाहेरुन दिली होती.

रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली 'आर्ची' यंदा दहावीत गेली. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले. मात्र तिने शाळेतूनच नाव काढून घेतलं होतं.

आर्ची जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमत होती. त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं.

सैराटचं शूटिंग आणि नंतर त्याचा कानडी रिमेक झाल्यामुळे अभ्यासापासून रिंकू काहीशी दुरावली होती. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला, असं रिंकू म्हणाली होती.

रिंकू आठवीत शिकत असताना ‘सैराट’चं शूटींग सुरू झालं होतं. तिने नववीची परीक्षा दिली आणि ‘सैराट’ रिलीज झाला होता. शूटींग आणि त्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन अशी कसरत करुन, रिंकूने नववीत 84 टक्के गुण मिळवले होते.

मात्र यंदा दहावीच्या वर्गात ती एकदाही बसली नव्हती. पण तरीही रिंकूने दहावीत 66.40 टक्के गुण मिळवले आहेत.

परीक्षा केंद्र बदललं

रिंकू राजगुरुने यंदा दहावीच्या परीक्षेचं केंद्र बदलून मिळावं असा अर्ज केला होता. तीने सोलापूर जिल्ह्यातून अर्ज भरला होता, त्यामुळे तिला त्याच भागातील परीक्षा केंद्र मिळालं होतं. पण त्या केंद्रावर परीक्षा देण्यास अडचण निर्माण होऊ शकते, असं वाटल्यामुळे तिने पुणे विभागीय बोर्डाला लेखी कळविल्यामुळे बोर्डाने तिला परीक्षा केंद्र बदलून दिलं होतं.

संबंधित बातम्या

...म्हणून आर्चीने शाळा सोडली !

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV