सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार

लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार

मुंबई : पुण्यातील सणसवाडी इथल्या दगडफेकीमागे हिंसक प्रवृत्तींचा हात असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले की, "भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तिथे जाऊन आपली भावना व्यक्त करतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा.

लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे."

"जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

सणसवाडीत वाद, परिस्थिती नियंत्रणात
भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.

या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला. सोमवारी झालेल्या वादामध्ये एका तरुणाचा मृत्यूही झाला.

राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे.

सखोल चौकशी करा : रामदास आठवले
गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. पण ही पहिलीच वेळ आहे, काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे आहे. तसंच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी शांतात ठेवावी. शिवाजी महाराजांचे मावळे एकमेकांवर हल्ले करुन तुटून पडत आहेत, हे दृश्य कोणालाही न आवडणारं आहे.

संबंधित बातमी

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

पाहा व्हिडीओरामदास आठवले काय म्हणाले?

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sanaswadi stone pelting : More attention was needed in the matter, says Sharad Pawar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV