हातात बांगड्या भरल्या नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांचा वाळूमाफियांना दम

तहसीलदार, तलाठी यांच्या अंगावर गाड्या घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आटपाडीमधील तहसीलदारावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, असं काळम यांनी सांगितलं.

हातात बांगड्या भरल्या नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांचा वाळूमाफियांना दम

सांगली : वाळू माफियांना प्रशासनाशी दोन हात करायचे असतील, तर प्रशासन कधीही तयार आहे. आम्ही काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, अशी दबंग भाषा वापरत सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी वाळू माफियांना गर्भित इशारा दिला आहे.

वाळू तस्कर कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. शिवाय तहसीलदार, तलाठी यांच्या अंगावर गाड्या घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आटपाडीमधील तहसीलदारावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, असं काळम यांनी सांगितलं.

आता तलाठयाला अडवून जप्त केलेली वाळूची गाडी वाळू तस्कर घेऊन गेले. यापुढे मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

वाळू तस्करीमुळे जिह्यात वाढत असलेली गुंडगिरी आणि तहसीलदार, तलाठी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बोलत होते.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sangali Collector gives ultimatum to sand mafia latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV