तासगाव शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनात विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रणाली पाटील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

तासगाव शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनात विद्यार्थिनीची आत्महत्या

सांगली : सांगलीत तासगावमधील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रणाली प्रकाश पाटील असं तरुणीचं नाव असून ती वाळवा तालुक्यातील साखराळे गावची आहे.

प्रणाली शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. रविवारी सकाळी रुममध्ये कोणी नसल्याचं पाहून तिने पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रणालीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनी आणि प्रणालीच्या रुममेट्स, शिक्षिका यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sangali : Girl student allegedly committed suicide in Tasgaon women’s college latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV