अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अनिकेतच्या तपासात काही निष्पन्न होत नाही. तसंच तपास योग्य रितीने होत नाही, असा आरोप करत दोन्ही भावांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सांगली: पोलिसांच्या थर्ड डीग्रीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

अनिकेतच्या तपासात काही निष्पन्न होत नाही. तसंच तपास योग्य रितीने होत नाही, असा आरोप करत दोन्ही भावांनी रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

सांगली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी आशिष कोथळे आणि अमित कोथळे या दोन्ही दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

थर्ड डिग्रीत तरुणाचा मृत्यू

दरम्यान, पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

याप्रकरणात 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण : पोलीस अधीक्षक शिंदेंची अखेर बदली


अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू


अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sangli Aniket Kothale murder case : anikets brothers attempt suicide
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV