अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार!

कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकमधील एका दिग्दर्शकाने ही ऑफर दिली आहे.

अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार!

सांगली:  सांगलीच्या आळसंद गावातील अण्णा म्हणून ओरडणाऱ्या कोंबड्याला एका चित्रपटाची ऑफर आली आहे. कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकमधील एका दिग्दर्शकाने ही ऑफर दिली आहे.

याशीवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार आहेत. त्यामुळे एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर, राज्यभर प्रकाशझोतात आलेला हा कोंबडा आता लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल, असे दिसतेय.

खानापूर तालुक्यातील आळसंद गावातील 'अण्णा' म्हणून ओरडणारा कोंबडा लाखो लोकांनी एबीपी माझावर पाहिला.

या कोंबड्याच्या बातमीवरुन सोशल मीडियावर जोक्स देखील सुरू झाले. पण आता कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकमधील एका दिग्दर्शकांने चित्रपटाची ऑफर दिली आहे. याशिवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार आहेत.ही सगळी मंडळी आळसंद गावात येऊन त्या अण्णांची भेटदेखील घेऊन गेले आहेत. कोंबडा विकण्यास नकार देत असलेल्या अण्णांनी, चित्रपटाची ऑफर मात्र स्वीकारली.

एबीपी माझावर हा कोंबडा पाहिल्यानंतर तालुका, जिल्हा आणि राज्यभरातून अनेक लोकांनी गावात जाऊन हा कोंबडा पहिला. अनेक हौशी लोकांनी लाखो रुपये देऊन हा कोंबडा विकत घेण्याचे आमिष दाखवले. पण अण्णांनी यास नकार दिला.

एका कोंबड्यामुळे आपल्या गावचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने, आळसंद गावातील नागरिकदेखील या कोंबड्यावर खुश आहेत.

VIDEO:

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sangli cock speak anna anna, got offer from karnataka film director
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV