लग्नासाठी तयार होत असताना नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू

लग्नाला उभं राहण्यासाठी काही क्षणाचा अवधी होता, त्यासाठी नवरदेवाची तयारी सुरु होती, मात्र त्याचवेळी नियतीने सारा खेळ बिघडवला.

लग्नासाठी तयार होत असताना नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू

सांगली:  लग्नाला उभं राहण्यासाठी काही क्षणाचा अवधी होता, त्यासाठी नवरदेवाची तयारी सुरु होती, मात्र त्याचवेळी नियतीने सारा खेळ बिघडवला.

लग्नाची तयारी सुरु असताना हृदयविकाराच्या धक्क्याने नवरदेवाचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

रवी मदन पिसे असं या दुर्दैवी नवरदेवाचं नाव आहे. रवी हा 27 वर्षांचा होता.

रवीचं आज लग्न होतं. त्यासाठी त्याची तयारी सुरु होती. मात्र अचानक रवीच्या छातीत दुखू लागलं. त्याला तातडीने मिरजेतील मिशन रुग्णालयात नेण्यात आलं. पण तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

रवीच्या या दुर्दैवी अंतामुळे आख्खा परिसर शोकसागरात बुडाला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: heart attack man died Sangli
First Published:
LiveTV