पतंगराव, जयंतरावांनी आपापली विधानसभा जागा सांभाळावी : पाटील

माजी आमदार आणि सध्या भाजपवासी असेलेले दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रकात पाटील बोलत होते.

पतंगराव, जयंतरावांनी आपापली विधानसभा जागा सांभाळावी : पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात वर्षानुवर्षे ज्यांनी साम्राज्य केले त्या पतंगराव कदम, जयंत पाटील यांना आपापल्या विधानसभा मतदार संघातील नगरपालिका, पंचायत समित्या वाचवता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगली महापालिका निवडणुकीत लक्ष घालू नये, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

माजी आमदार आणि सध्या भाजपवासी असेलेले दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रकात  पाटील बोलत होते.

भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्या आहे. त्यामुळे सांगली महापालिका निवडणूक 'किस झाड की पत्ती' असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा अवधी बाकी असतानाच भाजपने आपले शक्तीप्रदर्शन करायला सुरुवात केली आहे.

आर आर पाटील यांच्या ताब्यात असलेली तासगाव नगरपालिका संजयकाकांनी ताब्यात घेतली. इस्लामपुरातील नगरपालिका जयंत पाटलांकडून ताब्यात घेतली. तसंच कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्याकडून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यामुळे पतंगराव आणि जयंतराव यांनी महापालिकेत लक्ष घालू नये. त्यांनी आपापली विधानसभेची जागा सांभाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही चंद्रकात पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sangli : Patangrao, Jayantrao should hold their own assembly seat, advice Chandrakant Patil
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV