सांगलीत आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

सांगलीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेनेच्या दोन महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला.

सांगलीत आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

सांगली : दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या मागणीसाठी काल (सोमवार) सांगलीत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चात काढला होता. मात्र, या मोर्चात महिला शिवसैनिकांमध्येच राडा झाला. शिवसेनेतील महिला आघाडीच्या दोन गटातील वाद या मोर्चात उफाळून आला.

विश्रामबागमधील क्रांतिसिह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाल्यानंतर महिला शिवसैनिकांमध्ये मागे-पुढे चालण्यावरुन वाद होऊ लागला. शेवटी हा वाद टोकाला गेला आणि माजी महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या महिलेने आजी महिला जिल्हाध्यक्षच्या एका कार्यकर्तीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुरुष शिवसैनिकांनी वेळीच मध्यस्थी करत हा वाद सोडवला.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनापेक्षा सध्या महिला कार्यकर्त्यांच्या राड्याचीच चर्चा सांगलीत सध्या सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV