2 दिवसात 6 कोटी लिटर पाणी साठवलं, सांगोल्यातील शेतकऱ्याची शक्कल

By: | Last Updated: > Wednesday, 11 January 2017 11:27 AM
2 दिवसात 6 कोटी लिटर पाणी साठवलं, सांगोल्यातील शेतकऱ्याची शक्कल

सोलापूर : सांगोला तालुक्याला देवधर धरणाचे पाणी मिळण्यासाठी अनेकजण सरकार दरबारी आणि न्यायालयात लढा देत आहेत, 2008 पासून सिंचन अधिकृतरित्या सुरु झाले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थांची नोंदणी करून पाणी मिळविले. मात्र केवळ 2 दिवसाच्या रोटेशन मध्ये पाणी साठवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. त्यावर उपाय शोधला अनिरुद्ध पुजारी यांनी. दोन दिवसात त्यांनी 6 कोटी लिटर पाणी साठवून दाखवलं आहे.

 

सांगोल्याचे अनिरुद्ध पुजारी हे गेली अनेक वर्षे पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते, त्यांच्या लढाईला यश आलं. देवधर धरणाचे पाणी त्यांनी मिळवलं खरं मात्र पाण्याची पाळी केवळ दोन दिवसच मिळणार असल्याने हे पाणी अडवायचं कसं हा यक्षप्रश्न पुजारी यांच्यासमोर होता. यावरही त्यांनी मात केली आणि कोणतीही यंत्रसामुग्रीचा वापर न करता, फक्त दोन दिवसात तळ्यात 6 कोटी लिटर पाणी साठवलं.

 

पुजारी यांच्या पाणी वाटप संस्थेतील 270 शेतकऱ्यांनी थेट शेतीला पाणी दिले, तर काहींनी विहिरीत पाणी सोडलं. पुजारी यांनी मात्र नैसर्गिक उतारावरील जमीन निवडून 115 मीटर लांबीचे शेततळे आणि 414 मीटर लांबीचा मोठा कालवा बनवून घेतला. तळं बनवताना खोदलेली माती काढून त्याचे 8 मीटर खोल तळं बनवले. तळ्यात आणि कालव्यात कागद टाकून पाणी साठवण्याची व्यवस्था केली. देवधर धरणाचे पाणी येताच नैसर्गिक उताराने हे पाणी थेट पुजारी यांनी बनवलेल्या कालव्यातून तळ्यात जमा झाले. यामुळे सध्या 2 एकर क्षेत्राच्या तळ्यात साडेतीन कोटी लिटर आणि दीड एकर मोठ्या कालव्यात अडीच कोटी लिटर पाणी साठले.

 

हे शेततळे बनविताना पुजारी कुटुंबाला कागदासाठी 23 लाख आणि खोदाईसाठी 9 लाख रुपये खर्च आला. पण आता पुजारी यांच्या 50 एकर शेतीला ठिबकच्या साहाय्याने 150 दिवस हे पाणी पुरणार आहे. यात 15 एकर शेवगा , 25 एकर डाळिंब , 15 एकर द्राक्षे, कलिंगडे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात लावला आहे. त्यातून मिळणारा फायदा मोठा आणि दीर्घकालीन असेल, असा विश्वास अनिरुद्ध पुजारी यांना आहे.

 

पिढ्यानपिढ्या दुष्काळाची सवय झालेले शेतकरी पाणी मिळण्याची शक्यता दिसताच ते अडवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करतात. यात अशक्यप्राय वाटणाऱ्या अडचणीतून देखील ते कसा मार्ग काढतात याचंच उदाहरण अनिरुद्ध पुजारी यांनी  दाखवून दिलं आहे.

 

पाहा व्हिडीओ

 

First Published:

Related Stories

मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ
मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ

अहमदनगर: मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे,

अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!
अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!

नवी दिल्ली : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''

पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी