शेतातील वायरचा शॉक लागून साताऱ्यात दाम्पत्याचा मृत्यू

योगिता यांना शॉक लागल्यानंतर दीपक यांनी पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपक यांनाही शॉक लागल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला.

शेतातील वायरचा शॉक लागून साताऱ्यात दाम्पत्याचा मृत्यू

सातारा : विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे साताऱ्यात दाम्पत्याला जीव गमवावा लागला आहे. शेतात पडलेल्या वायरमधून शॉक लागल्यामुळे साताऱ्यातील निंबळक गावात पती-पत्नीचा मृत्यू झाला.

विद्युत महामंडळाची वायर मतकर दाम्पत्याच्या शेतात पडलेली होती. दीपक मतकर, पत्नी योगिता मतकरसह सकाळी आपल्या शेतात जात होते. त्यावेळी पहिल्यांदाचा योगिता यांचा विद्युत प्रवाह सुरु असलेल्या वायरीवर पाय पडला.

दीपक यांनी पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपक यांनाही शॉक लागल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला.

विद्युत महामंडळला याची माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. यावेळी
संतापलेल्या ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV