ट्रॅव्हल्सच्या धडकेत महिलेचा मृत्यू, जमावाच्या मारहाणीत चालक ठार

अपघातात महिलेचा चिरडून मृत्यू झाला, तर चौघं जण गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रॅव्हल्सच्या धडकेत महिलेचा मृत्यू, जमावाच्या मारहाणीत चालक ठार

सातारा : ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत महिलेचा चिरडून मृत्यू झाला, तर त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रॅव्हल्स चालकालाही प्राण गमवावे लागले आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर हा अपघात घडला.

पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याजवळ पाच प्रवासी गाडीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आलेल्या ट्रॅव्हल्सने पाचही जणांना चिरडलं. यामध्ये महिलेचा चिरडून मृत्यू झाला, तर चौघं जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जमावाने ट्रॅव्हल्स चालकाला खाली खेचलं आणि त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती, की चालकाचा मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Satara : Lady died as travels bus hits, driver killed by mob latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV