झटपट श्रीमंतीचा नाद, स्वयंघोषित महाराजाकडून पैलवानाची हत्या

रेडिएशन पॉवरद्वारे लोकांचे पैसे आपल्या घरात आणण्याचा दावा भोंदूबाबा करत होता. याच आमिषाने सुमारे वर्षभरापूर्वी कराड तालुक्यातल्या पैलवान किशोर गायकवाडने त्यात 11लाख गुंतवले.

झटपट श्रीमंतीचा नाद, स्वयंघोषित महाराजाकडून पैलवानाची हत्या

सातारा : झटपट श्रीमंतीच्या नादाने पैलवानाची हत्या केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या तिघांनी झटपट श्रीमंतीचा धंदा उघडला होता.

सर्जेराव सावंत... स्वयंघोषित महाराज... रेडिएशन पॉवरद्वारे लोकांचे पैसे आपल्या घरात आणण्याचा दावा तो करत होता. याच आमिषाने सुमारे वर्षभरापूर्वी कराड तालुक्यातल्या पैलवान किशोर गायकवाडने त्यात 11लाख गुंतवले. घरात रेडीएशन पॉवरवाला पॉट आला, पण पैसे काही येईनात. म्हणून किशोरने महाराजाकडे तगादा लावला.

याच तगाद्याला कायमचं संपवण्यासाठी महाराजाने आपल्या दोन साथिदारांसह त्याचा काटा काढला. सातारा जिल्ह्यात या रेडिएशन पॉवरच्या खेळात अनेकांचे हात पोळल्याची चर्चा आहे.

बडे बडे अधिकारी, नेत्यांनाही या महाराजानं आतापर्यंत 10 कोटींचा गंडा घातल्याची कुजबूज आहे.साताऱ्यातील एकांत असलेल्या बंगल्यामध्ये असे प्रकार होत असल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख सांगतात.

अशा एखाद्या तांब्या-पितळीच्या मडक्याने दुसऱ्याचे पैसे घरात येत असते, तर तांब्या-पितळीची भांडी विकणारा प्रत्येक जण अंबानी झाला असता. रेडिएशन पॉवर पेक्षा कष्ट करण्याची पॉवर बाळगा, नक्की फायदा होईल.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Satara : Wrestler killed by Bhondu baba due to superstition latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV