गडचिरोलीमध्ये CRPF चे सात जवान 150 नक्षल्यांना पुरुन उरले

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटानंतर कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकाला रविवारी ग्यारापत्ती जंगलामध्ये सुमारे 150 नक्षलवाद्यांनी घेरलं. यानंतर नक्षल्यांनी बेछूट गोळीबार केला. पण सात जवानांनी औलोकिक पराक्रम गाजवत 150 नक्षल्यांना झुंजवलं.

गडचिरोलीमध्ये CRPF चे सात जवान 150 नक्षल्यांना पुरुन उरले

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्या सरनोबतांपैकी प्रतापराव गुजर यांनी नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाला दिलेली लढाई आपण इतिहासात वाचली आहे. या घटनेवरील ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गीत ऐकून अनेकांना स्फूरण चढतं. पण अशीच एक लढाई काल गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात घडली.

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटानंतर कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकाला रविवारी ग्यारापत्ती जंगलामध्ये सुमारे 150 नक्षलवाद्यांनी घेरलं. यानंतर नक्षल्यांनी बेछूट गोळीबार केला. पण सात जवानांनी औलोकिक पराक्रम गाजवत 150 नक्षल्यांना झुंजवलं.

संध्याकाळी 6 वाजता सुरु झालेली ही चकम अनेक तास सुरु होती. पण सीआरपीएफच्या फक्त सात जवानांनी तब्बल 150 नक्षल्यांचा निधड्या छातीने मुकाबला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे मंजुनाथ निजलिंगाप्पा शहीद झाले. तर लोकेश कुमार आणि दीपक शर्मा जखमी झाले.

या सात जणांच्या मदतीसाठी गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक निघाली. पण रात्र असल्याने मदत वेळेत पोहोचू शकली नाही. तरीही आपल्या जाँबांज जवानांनी नक्षलवाद्यांचा चोख प्रत्युत्तर दिलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: seven crpf jawan fight 150 naxlist in gadchiroli
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV