क्रिकेट मॅच खेळण्याच्या नावाखाली मुलांचे लैंगिक शोषण, प्रशिक्षक अटकेत

sexual abuse in nanded for cricket coaching latest updates

नांदेड : पंजाबमधील एका क्रीडा प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याची बाब नांदेड शहरात उघडकीस आली आहे. सल्वींदरसिंग नामक क्रिडा प्रशिक्षक क्रिकेट सामन्यांसाठी नांदेडमध्ये 13 मुलांना घेऊन आला होता. त्यानेच केलेल्या चोरीच्या बनावानंतर लहान मुलांचं लैंगिक शोषण उघडकीस आलं आहे.

पंजाब राज्यातील सल्वींदरसिंग हा पंजाब राज्यातीलच 13 मुलांना नांदेड मध्ये क्रिकेट सामने खेळण्याच्या नावाखाली घेवून आला. यात्री निवासमध्ये 2 खोल्या घेऊन तो मागील 3 दिवसापासून नांदेडमध्ये राहिला. दरम्यान सल्विंदरसिंगला दिलेल्या खोलीच्या परिसरात कपडे चोरीला गेल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर यात्री निवास च्या सुरक्षा विभागाने सिसिटीव्ही फुटेज तपासले…यात सल्विंदरसिंग हा कपडे चोरत असल्याच दिसल.

सल्विंदरसिंगच्या खोलीची तपासणी केली असता चोरीला गेलेले कपडे सापडले. यावेळी सल्विंदरसोबत असलेल्या लहान मुलांनी सुरक्षा रक्षकांना सल्विंदर आपल्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसात तक्रार देण्यात आली.

नांदेड शहरात कोणतेही क्रिकेट सामने सुरु नाहीत. केवळ फसवणूक करून आरोपी सल्विंदर याने एकूण 13 मुलांना पंजाब येथून नांदेडला आणलं आणि त्यातील तिघांवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलामंखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sexual abuse in nanded for cricket coaching latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी...

नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित… 2008 च्या मालेगाव

चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी
चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी

सातारा : एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याची घटना

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची तयारी
राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची...

सिंधुदुर्ग : एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी

VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!
VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!

औरंगाबाद : मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार

राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी

नागपूर : राम सत्यवचनी होता, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017   राज्यभरात पावसाचं दमदार

भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार
भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार

कोल्हापूर :  सरकारमध्ये मंत्री कोण असावं, कोण नसावं, याचा निर्णय

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात

रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त
रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त

रायगड : माणगावमध्ये 3 वाहनांतून गोमांस सदृश्य मांस जप्त  करण्यात आलं

नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी
नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.