अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापक अटकेत

मुख्याध्यापक दिगंबर शिंदे हा दुपारच्या वेळेत काही मुलींना वर्गातच थांबवून ठेवायचा. त्यानंतर त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ करायचा.

अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापक अटकेत

बीड : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील ढोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या शाळेतील मुख्याध्यापकच विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक दिगंबर शिंदे याला वडवणी पोलिसांनी अटक केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक दिगंबर शिंदे हा दुपारच्या वेळेत काही मुलींना वर्गातच थांबवून ठेवायचा. त्यानंतर त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ करायचा. मात्र, हा सर्व प्रकार असह्य झाल्यानं एका विद्यार्थिनीनं हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि नराधम मुख्याध्यापकाचं बिंग फुटलं.

मुख्याध्यापक दिगंबर शिंदे हा गेल्या अनेक महिन्यांपासून अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करत असल्याचे उघड झालं आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तो काही मुलींना वर्गात बोलावून घ्यायचा आणि त्यांना मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ करायचा.तसेच या सर्वाची कुठेही वाच्यता करु नये यासाठी तो त्यांना धमकीही देत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

या सर्व प्रकाराची माहिती मिळताच संबंधित मुलींच्या पालकांनी वडवणी पोलीस ठाण्यात धाव घेत मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दिंगबर शिंदेला बेड्या ठोकल्या.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षिततेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाला कायमची अद्दल घडविण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sexual harassment of the students by showing pornographic video principal arrested in beed latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV