“जमिनींना योग्य मोबदला द्या, अन्यथा मंत्रालयात येऊन सामूहिक आत्महत्या करु”

विशेष म्हणजे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत, एकरी 50 लाख नव्हे, तर 1 कोटी मदत मिळायला हवी, अशी घोषणा दिल्यानं उपस्थितांच्या देखील भुवया उंचावल्या.

“जमिनींना योग्य मोबदला द्या, अन्यथा मंत्रालयात येऊन सामूहिक आत्महत्या करु”

धुळे : शासन दरबारी चकरा मारुनही न्याय न मिळाल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करुन स्वतःच जीवन संपवलं. या घटनेला एक महिन्याचा अवधी पूर्ण होत नाही, तोच धर्मा पाटील यांच्या शिंदखेडा तालुक्यातील चार गावातील जवळपास 200 शेतकऱ्यांनी 31 मार्चला मंत्रालयात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या या इशाऱ्याने सरकारी यंत्रणेची झोप उडाली आहे.

667.31 हेक्टर क्षेत्रावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसीचा टप्पा क्रमांक तीन उभा राहतो आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या शेतजमिनीला किमान 50 लाख रुपये एकरी भरपाई मिळावी, अन्यथा 31 मार्चला मंत्रालयात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा गोराणे, माळीच, मेलाणे, जातोडा या चार गावातील जवळपास 200 शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

शेतकऱ्यांचं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात धरणे आंदोलन सुरु असताना भाजप वगळता सर्व पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

विशेष म्हणजे, ज्यांच्या मतदारसंघातील हे शेतकरी आहेत, त्या शिंदखेडा विधानसभेचे आमदार, रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत, एकरी 50 लाख नव्हे, तर 1 कोटी मदत मिळायला हवी, अशी घोषणा दिल्यानं उपस्थितांच्या देखील भुवया उंचावल्या.

यानंतर जयकुमार रावल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन परिस्थिती ज्ञात करुन दिली. यानंतर उद्योगमंत्र्यांनी 30 मार्चपर्यंत यावर योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. 30 मार्चपर्यंत सरकारने आपला निर्णय जाहीर केला नाही, तर 31 मार्चला मंत्रालयात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shindkheda Farmers warns Government over land acquisition benefits
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV