शिर्डीत साईबाबांच्या दरबारात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी

अपप्रवृत्तीच्या पुष्पगुच्छ विक्रेत्यांना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनीही संस्थानाकडे केली होती.

शिर्डीत साईबाबांच्या दरबारात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी

शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या दरबारात यापुढे पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.

याआधी मंदिरात नारळ घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर वापरलेले पुष्पगुच्छ पुन्हा विक्रीला येत असल्याचं साई संस्थानच्या निदर्शनास आलं. त्याचप्रमाणे अनेक भाविक पुष्पगुच्छ दुरुनच साईंच्या मूर्तीवर फेकत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

अपप्रवृत्तीच्या पुष्पगुच्छ विक्रेत्यांना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनीही संस्थानाकडे केली होती. हे प्रकार थांबवण्यासाठी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरुन अखेर पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मात्र कोणतीही बंदी नसेल, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shirdi : Flower bouquet wont be allowed in Saibaba’s temple latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV