उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच शिर्डी-हैदराबाद विमान रद्द

लगेजसंदर्भात प्रवाशांमध्ये झालेला घोळ आणि अपुऱ्या प्रकाशामुळे विमानाचं उड्डाण रद्द केल्याची माहिती मिळते आहे.

उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच शिर्डी-हैदराबाद विमान रद्द

शिर्डी : मुंबई-शिर्डी विमानसेवा सुरु होऊन अवघा एक दिवस झाला आहे. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचं उड्डाण रद्द झालं आहे.

लगेजसंदर्भात प्रवाशांमध्ये झालेला घोळ आणि अपुऱ्या प्रकाशामुळे विमानाचं उड्डाण रद्द केल्याची माहिती मिळते आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते काल मोठ्या दिमाखात मुंबई-शिर्डी विमानसेवेचं उद्घाटन झालं होतं. काल पहिल्या विमानाचं मुंबईहून-शिर्डी उड्डाण झालं. त्यानंतर दुपारी शिर्डीहून हैदराबादकडेदेखील विमानाचं उड्डाण झालं. मात्र, आज दुसऱ्या दिवशी हे विमान शिर्डीहून हैदराबादकडे रवाना होऊ शकलं नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV