साई पादुका दर्शन ही विश्वस्तांची फॅमिली ट्रीप, शिर्डीवासी भडकले

शिर्डीतील ग्रामस्थांच्या विरोधानंतर संस्थानानं पुढच्या महिन्यात अमेरिकेत होणारा साईपादुका दर्शन सोहळा रद्द केला आहे

साई पादुका दर्शन ही विश्वस्तांची फॅमिली ट्रीप, शिर्डीवासी भडकले

शिर्डी : साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेला साईपादुका दर्शन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा पादुका दर्शन सोहळा नसून विश्वस्तांची फॅमिली ट्रीप असल्याचा आरोपही शिर्डीतल्या ग्रामस्थांनी केला आहे.

शिर्डीतील ग्रामस्थांच्या विरोधानंतर संस्थानानं पुढच्या महिन्यात अमेरिकेत होणारा साईपादुका दर्शन सोहळा रद्द केला आहे. शिर्डीत साई संस्थान विश्वस्तांची बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी विश्वस्तांना चांगलंच धारेवर धरलं.

साईपादुका देश-विदेशात नेण्यापेक्षा साईभक्त शिर्डीत कसे येतील, त्यांना राहण्यासाठी अधिक सोयी कशा मिळतील, याकडे लक्ष द्या, असं यावेळी विश्वस्तांना बजावण्यात आलं.

हा पादुका दर्शन सोहळा नसून विश्वस्तांची फॅमिली ट्रीप असल्याचा आरोपही शिर्डीतल्या ग्रामस्थांनी केला. या सोहळ्याच्या नावाखाली आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shirdi : Natives blame Sai Paduka Darshan is Family trip for Trustees latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV