चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे साईचरणी कोट्यवधींचं विक्रमी दान

सलग आलेल्या सुट्ट्या आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसात आलेल्या साईभक्तांनी बाबांच्या दानपेटीत देणगी स्वरुपात पाच कोटी 50 लाख रुपयांचं विक्रमी दान अर्पण केलं.

चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे साईचरणी कोट्यवधींचं विक्रमी दान

शिर्डी : शनिवार-रविवार आणि नाताळ अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक साईभक्तांनी शिर्डीकडे धाव घेतली. त्यामुळे चार दिवसात साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान जमा झालं आहे. सलग आलेल्या सुट्टयांमुळे चार दिवसात पाच कोटी 50 लाख रुपयांचं एकूण दान मिळालं आहे.

साईबाबांच्या दानपेटीत 3 कोटी 10 लाख रुपये जमा झाले आहेत. तर 22 लाख रुपये किमतीचं सोनं, तर दोन लाखांची चांदी साईबाबांच्या झोळीत जमा झाली आहे. मागील वर्षी पाच दिवसात आलेल्या दानाच्या तुलनेत यावेळी तब्बल एक कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

शिर्डीला राज्यातूनच नव्हे तर देशभरातील साईभक्त दर्शनासाठी येतात. दरवर्षी साईबाबांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर दान जमा होतं. 22 डिसेंबरपासून शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सलग आलेल्या सुट्ट्या आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसात आलेल्या साईभक्तांनी बाबांच्या दानपेटीत देणगी स्वरुपात पाच कोटी 50 लाख रुपयांचं विक्रमी दान अर्पण केलं.

ऑनलाइन व्दारे - दहा लाख आठ हजार
देणगी काऊंटर - एक कोटी दहा लाख
डेबीट / क्रेडीट कार्ड - 38 लाख 40 हजार
डीडी / चेक - 23 लाख 58 हजार
मनीऑर्डर - दोन लाख 35 हजार
सोने - 781 ग्रॅम ( 22 लाख रुपये )
चांदी - सात किलो 600 ग्रॅम ( दोन लाख 15 हजार )

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shirdi : Sai Baba Temple receives record break Donation in four day holidays latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV