निलेश राणेंना अडीच लाख मतांनी हरवू: विनायक राऊत

मी उमेदवार असेल वा अन्य कोणी असो, निलेश राणे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत करणारच, असं विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

निलेश राणेंना अडीच लाख मतांनी हरवू: विनायक राऊत

रत्नागिरी: शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही, असं म्हणणाऱ्या निलेश राणे यांना विनायक राऊत यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.

निलेश राणे यांचा अडीच लाख मतांनी पराभूत करु, असं विनायक राऊत म्हणाले.

येणाऱ्या लोकसभेत विनायक राऊतांना पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही,  असा निर्धार माजी खासदार निलेश राणे यांनी काल कुडाळमधल्या सभेत केला होता. यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

निलेश राणेंचं आव्हान स्वीकारतो

माजी खासदार निलेश राणे यांचं आव्हान तर आम्ही स्वीकारलेच आहे. उद्या मी उमेदवार असेल वा अन्य कोणी असो, निलेश राणे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत करणारच, असं विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

‘शक्तीप्रदर्शन नव्हे, केविलवाणं दर्शन’

नारायण राणे यांचं शक्तीप्रदर्शन नव्हतं तर ते  केविलवाणं दर्शन होतं. नारायण राणे ब्रम्हराक्षस आहे तो कधी भाजपात जातो याची आम्ही वाटच पाहात आहोत. आज ते ज्या भाषेत बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोलतात, पुढील सहा महिन्यात ते असंच भाजपच्या नेत्यांबद्दल बोलू लागतील, असं खासदार विनायक राऊत म्हणाले.

निलेश राणे काय म्हणाले होते?

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी कुडाळमधील सभेत घेतली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनीच निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते. शिवाय, शिवसेना आणि नारायण राणे यांचं वैर सर्वश्रुत आहे.संबंधित बातमी

...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV