तूर खरेदीसाठी शिवसेना आक्रमक, आमदाराचं महामार्गावरच मुंडन

तूर खरेदीसाठी शिवसेना आक्रमक, आमदाराचं महामार्गावरच मुंडन

चंद्रपूर : तूर खरेदीच्या मुद्द्यावर चंद्रपुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. चंद्रपुरातील वरोरा शहरात महामार्गावर शिवसेनेने चक्काजाम आंदोलन केले. राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आमदार बाळू धानोरकर यांनी मुंडन केले आणि सरकारचा निषेध व्यक्त केला.

सरकारी धोरणाच्या निषेधार्थ शिवसेनेचे स्थानिक आमदार बाळू धानोरकर यांनी मुंडन केले. चंद्रपुरात तूर खरेदीतील धोरण लकव्याचे कारण पुढे करत स्थानिक आमदार बाळू धानोरकर यांनी मोठे चक्काजाम आंदोलन केले. जिल्ह्यातील वरोरा शहरातून चंद्रपूर-नागपूर महामार्ग जातो. नेमक्या याच भागात शिवसेनेने चक्काजाम आंदोलन केले.

Balu Dhanorkar 1

शिवसैनिकांनी बैलगाड्याद्वारे हा महामार्ग रोखून धरला. तूर खरेदी संदर्भातील वेगवेगळे आदेश आणि त्यातून शेतकऱ्यांची झालेली संभ्रमावस्था यामुळे शेतकरी नागवला गेल्याचा आरोप शिवसेनेने आंदोलनात केला.

एकट्या वरोरा परिसरातील नोंदणी केलेल्या 1304 शेतकऱ्यांपैकी केवळ 292 शेतकऱ्यांची 3996 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, 1012 शेतकऱ्यांची 16 हजार 204 क्विंटल तूर खरेदी बाकी असल्याचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आमदार बाळू धानोरकर यांनी महामार्गवरच मुंडन केले. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे चंद्रपूर -नागपूर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक एक तास ठप्प झाली होती. वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात शिवसैनिकांनी तुरीच्या घुगऱ्या वाटून आला निषेध व्यक्त केला. हे आंदोलन तासभर चालल्यावर आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांना ताब्यात घेतले आणि वाहतूक सुरळीत केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV