शिवसेना गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार

गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली

शिवसेना गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार

पणजी : शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यादृष्टीने आता पावलं टाकण्यास शिवसेनेनं सुरुवात केली आहे. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा सेना लढवणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली.

आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आतापर्यंत इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.

पर्रिकरांना हवा मानवली नाही : राऊत

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती लवकर बरी व्हावी आणि ते पुन्हा सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छाही संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. मनोहर पर्रिकर यांना दिल्लीची हवा मानवली नसावी, असंही यावेळी राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या


काकडेंचे आकडे : स्वतंत्र लढल्यास शिवसेना 5, भाजप 28


अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा : उद्धव ठाकरे


शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार! 


आदित्य ठाकरेंसह 5 नवे चेहरे शिवसेनेच्या नेतेपदी!

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shivsena to contest two Loksabha seats in Goa, says MP Sanjay Raut
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV