एसटी डेपोतील मॅकेनिकला महिलांकडून बेदम चोप

जळगाव बस डेपोत यांत्रिक विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला सहकार्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका मॅकेनिकला आज (गुरुवार) शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

एसटी डेपोतील मॅकेनिकला महिलांकडून बेदम चोप

जळगाव : जळगाव बस डेपोत यांत्रिक विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला सहकार्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका मॅकेनिकला आज (गुरुवार) शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

जळगाव बस डेपोत यांत्रिक विभागात आदिल शेख हा मॅकेनिक म्हणून कार्यरत आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याने याच विभागातील एका प्रशिक्षणार्थी महिलेची छेड काढली होती. या घटनेची शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी थेट डेपोतच धडक दिली.

या महिला कार्यकर्त्यांनी शेख याला आज (गुरुवार) बस स्थानक परिसरात पकडून बेदम मारहाण केली. तसेच शेख याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. या संपूर्ण घटनेनंतर महामंडळाने पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित केले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: shivsena women workers beaten to ST Depo Mechanical latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV