शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून भाजपला धारेवर धरणार!

सत्तेत राहून भाजपला धारेवर धरण्याची रणनिती शिवसेना शेवटपर्यंत अवलंबणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून भाजपला धारेवर धरणार!

मुंबई : शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार याची घोषणा शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यात केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महागाई विरोधात शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टोकाची घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय भाजप आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली. त्यामुळे दोन्ही पक्ष काडीमोड घेणार का, या चर्चेला ऊत आला होता.

सत्तात्यागाची घोषणा दसरा मेळाव्याच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असं बोललं जात होतं. मात्र शिवसेनेचे आमदार फुटणार, अपक्ष किंवा राष्ट्रवादी भाजपला पाठींबा देणार, अशा शक्यतांना पूर्णविराम देण्यासाठी शिवसेना सत्तेतच राहणार आहे.

सत्तेत राहून भाजपला धारेवर धरण्याची रणनिती शिवसेना शेवटपर्यंत अवलंबणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असले तरी शिवसेनेतील वरिष्ठ पातळीवर सत्तेतून बाहेर पडण्याची मानसिकता नसल्याचंही बोललं जात आहे. कारण शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच सत्तेतून बाहेर पडण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यावेळीही शिवसेनेत दुफळी दिसून आली होती.  शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेचेच 20 ते 22 आमदार भाजपला पाठिंबा देतील, असा दावाही अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला होता.

संबंधित बातमी : अनिल परब-आशिष शेलारांनी एकमेकांची लायकी काढली

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: power Shivsena शिवसेना सत्ता
First Published:
LiveTV