अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे

उपमहापौरपदाची निवडणूक सुरु होताच राष्ट्रवादी, मनसे आणि बंडखोर गटाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला.

अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली. छिंदमच्या गच्छंतीनंतर नगरचं उपमहापौरपद रिक्त झालं होतं.

उपमहापौरपदाची निवडणूक सुरु होताच राष्ट्रवादी, मनसे आणि बंडखोर गटाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला. प्रथमच महापालिकेत सत्तास्थानी शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड झाली.

छिंदम प्रकरणी पश्चाताप म्हणून भाजपनं उपमहापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर भाजप निवडणूक प्रक्रियेतही सहभागी झालं नव्हतं. तर घोडेबाजार होऊ नये म्हणून राष्ट्रवादीनं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं पक्षानं सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला गेल्या महिन्यात उपमहापौरपदावरुन निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे अहमदनगरचं उपमहापौरपद रिक्त होतं.
उपमहापौरांपदाची निवड होताच शिवसैनिकांनी 'जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष करत सभागृह दणाणून सोडलं. गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करुन शिवसैनिकांनी जल्लोष केला.
यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी भाजप खासदार दिलीप गांधी आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. 'शिवसेना अभेद्यच राहणार असून सेनेसमोर कोणतेही नेतृत्व टिकत नाही. छिंदम प्रकरणी खासदार गांधींचं प्रायश्चित्त खोटं आहे. गांधींनी तटस्थ राहून छिंदमचं समर्थन केलं' असा आरोप राठोड यांनी केला.


दिलीप गांधींनी खालची पातळी गाठल्याचा आरोपही अनिल राठोड यांनी केला. तर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी राज्याचं वाटोळं केल्याचा आरोपही राठोड यांनी केला.श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्दचा ठराव मंजूर

अहमदनगर महापालिकेत 26 फेब्रुवारीला भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.

संबंधित बातम्या :


छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा ठराव मंजूर


उपमहापौर छिंदमचा राजीनामा मंजूर, नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी


छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्तापशिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम


शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे


श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत


नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shivsena’s Anil Borude elected unopposed as Ahmednagar’s deputy mayor latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV