शिवबंधनपाठोपाठ आता शिवसेनेची वाघाची अंगठी!

शिवसैनिकांमध्ये अंगार पेटवण्यासाठी शिवबंधन पाठोपाठ आता खास व्याघ्रमूठ तयार करण्यात आली आहे.

शिवबंधनपाठोपाठ आता शिवसेनेची वाघाची अंगठी!

मुंबई : शिवसैनिकांमध्ये अंगार पेटवण्यासाठी शिवबंधन पाठोपाठ आता खास व्याघ्रमूठ तयार करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुलाबा विधानसभेचे शिवसेनेचे समन्वयक कृष्णा पवळे यांच्या संकल्पनेतून वाघाची अंगठी तयार करण्यात आली आहे.

खासदार अरविंद सावंत आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते ८८ जणांना या अंगठीचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे यापुढे शिवबंधनासोबतच ही अंगठीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती दिसेल.

दरम्यान, या वाघ अंगठीच्या प्रेमात सारेच शिवसैनिक पडल्यामुळे भविष्यात या अंगठीची मोठ्या प्रमाणात मागणी जोर धरेल, असा विश्वास या अंगठीची संकल्पना साकारणाऱ्या कृष्णा पवळे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shivsena’s Tiger Ring for shivsena workers latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV