गजानन महाराजांचा 140 वा प्रकटदिन, शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी

गजानन महाराजाचा आज 140 वा प्रकटदिन आहे. यानिमित्त शेगावमध्ये आज विविध कार्यक्रम होणार आहे.

गजानन महाराजांचा 140 वा प्रकटदिन, शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी

बुलडाणा : गजानन महाराजाचा आज 140 वा प्रकटदिन आहे. यानिमित्त शेगावमध्ये आज विविध कार्यक्रम होणार आहे. महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

दरवर्षीप्रमाणे शेगावमध्ये गजानन महाराजांना प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, यंदा या महोत्सवाचे 140 वे वर्ष आहे.  यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी शेगाव आणि आसपासच्या परिसरातून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

या महोत्सवानिमित्त शेगाव नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.

याशिवाय, आज एका मोठ्या महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे. या महाप्रसादात पिठलं आणि भाकरीचा प्रसाद दिला जाणार आहे. त्यासाठी तब्बल 100 हून अधिक चुलींवर आज इथं ज्वारीच्या भाकरी बनवण्याचं काम सुरु आहे.

याशिवाय, गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त मुख्य यात्रा महोत्सवात जवळ पास एक हजारापेक्षा जास्त भजनी दिंड्या सहभागी होणार आहेत. यात एकूण एक ते दोन लाख वारकरी भाविक सहभागी होतील.

दरम्यान, या प्रकटदिन महोत्सवासाठी श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने भक्तांच्या सेवसाठी चोख व्यवस्था केली आहे. तसेच, पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: shree gajanan mahraj prakatdin mohotsav celebration in shegaon
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV