मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये स.आयुक्ताचं नाव

मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये स.आयुक्ताचं नाव

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी संजय व्हटकर यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं व्हटकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

सुसाईड नोटमध्ये सोलापूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अभिजीत हराळे, सफाई अधीक्षक ए के आराध्ये आणि निवृत्त अधीक्षक राजू सावंत या  तिघांच्या नावाचा उल्लेख आहे. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील कचरा संकलनाचा ठेका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. खरंतर महानगरपालिका कर्मचारी संघटनेने कचरा उचलण्याच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध केला होता. आंदोलनं केली होती. कामगार आणि कर्मचाऱ्यांचा विरोध झुगारुन कचरा संकलन खाजगी कंपनीला देण्यात आलं. त्यातील मनमानी कारभाराला मदत करण्याचा दबाव व्हटकर यांच्यावर होता. याच विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
Solapur_Suicide_Note
कचरा संकलन ठेका देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्हटकर यांना होता. यामुळेच कोणत्याही प्रकरणात फाईलवर सही करताना ते सारासार विचार करायचे. त्यांचा हा सरळ स्वभाव वरिष्ठांच्या आड येत होता. सांगेल तिथे सही करावी असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आग्रह होता. व्हटकर यांच्याकडून कसलीच मदत होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.

दरम्यान नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सोलापूर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे.

First Published: Friday, 21 April 2017 9:46 AM

Related Stories

नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20 नगरसेवकांचं राजीनामास्त्र
नवी मुंबईत शिवसेनेचं नाराजीनाट्य, 20...

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई शिवसेनेत

वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन मुलं ताब्यात, चाईल्ड ट्रॅफिकिंगचा संशय
वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन...

वर्धा : सात अल्पवयीन मुलांना झारखंडमधून सुरतमध्ये घेऊन जात

शेतातील बांधावर विवाह, नवरा-नवरीसह वऱ्हाडींचं श्रमदान
शेतातील बांधावर विवाह, नवरा-नवरीसह...

वाशिम : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिममधल्या एका गावात

गोंदियात गर्भवतीची पतीकडून कुऱ्हाडीने वार करुन हत्या
गोंदियात गर्भवतीची पतीकडून...

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा गावात घरघुती वादातून पतीने

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी...

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वर शिवसेना

GST साठी 17 मे रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
GST साठी 17 मे रोजी विधीमंडळाचं विशेष...

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी

अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, प्रशासन हादरलं!
अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक...

बुलडाणा : महावितरणबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारी गांभिर्याने घेत

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017 1. हुंड्याविरोधात हुंकार,

गोंदियात पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांच्या मनसुब्यांना सुरुंग
गोंदियात पोलिसांच्या सतर्कतेने...

गोंदिया : नक्षल्यांनी दिलेली धमकी गावकऱ्यांनी पाहिली नसती, तर

दुसरीही मुलगी झाल्याने बापाने 10 दिवसांच्या बाळाला विष पाजलं
दुसरीही मुलगी झाल्याने बापाने 10...

हिंगोली : दुसरीही मुलगीच झाल्यामुळे नाराज झालेल्या पित्यानं तिला