पंढरपुरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाखांच्या रकमेची लूट

बोलेरो गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी बँकेच्या गाडीला धडक मारुन थांबवली.

पंढरपुरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाखांच्या रकमेची लूट

पंढरपूर : पंढरपुरात चार चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे तब्बल 70 लाख रुपये चोरल्याचा प्रकार घडला आहे. डोळ्यात चटणी टाकून कारमधून ही रोकड लांबवण्यात आली.

सांगोल्याहून पंढरपूरकडे बँक ऑफ महाराष्ट्रची 70 लाखांची रक्कम खाजगी वाहनाने नेण्यात येत होती. बॅंक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले खासगी आय 20 कारने ( MH 45 N 5831) ही रोकड घेऊन निघाले होते

त्यांच्या कारला बोलेरो गाडी आडवी लावून गाडीची काच फोडण्यात आली. चोरट्यांनी गाडीतील दोघांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि पैसे घेऊन पोबारा केला.

या घटनेनंतर पोलिसांनी सगळ्या रस्त्यांची नाकेबंदी केली असून संपूर्ण जिल्हाभर तपास सुरु आहे. मात्र बँक ऑफ महाराष्ट्रची इतकी मोठी रक्कम खाजगी वाहनातून नेण्यात आलीच कशी? गाडी सुरक्षारक्षकाशिवाय गेली कशी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Solapur : Robbers loot cash from Bank of Maharashtra’s van
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV