बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मीस्टाईल दरोडा, 9 प्रवासी वाहनं लुटली

प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली.

बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मीस्टाईल दरोडा, 9 प्रवासी वाहनं लुटली

सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला. बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून फिल्मीस्टाईल लूट केली.

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वाहनं थांबवून दहशत माजवली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली. इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यासह खाजही ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा समावेश होता.

दरोडेखोरांनी फक्त लूटमारच केली नाही तर लहान मुलं आणि महिलांनाही मारहाण केली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी सकाळी कुर्डुवाडी पोलिस स्टेशन गाठलं आणि दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Solapur : Robbery at Barshi-Kurduwadi road, 9 passengers vehicles looted
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV