सांगलीच्या जवानाचं डोकलाममध्ये अपघाती निधन

भारत-चीन सीमेवर डोकलाम येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या वाहनाच्या अपघातात सांगलीचे जवान अजित काशिद यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सांगलीच्या जवानाचं डोकलाममध्ये अपघाती निधन

सांगली : जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशिद (वय 24) यांचा भारत-चीन सीमेवर डोकलाम येथे सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने त्यांना मंगळवारी शहीद घोषित करण्यात आलं. बुधवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा सैनिक विभागाकडून याची माहिती मिळताच जत तालुका प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली.

काशिद यांना शहीद घोषित केल्याचा संदेश पाठवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्द येथे अत्यसंस्कार करण्यात येतील. तशी तयारी निगडी येथे करण्यात आली आहे.

शहीद जवान अजित काशिद यांच्या मुत्यूमुळे संपुर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. शासकीय यंत्रणांनी अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे. अजित काशिद अविवाहित होते. त्याच्या पश्र्चात आई वडील, विवाहित बहिण, भाऊ असा परिवार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV