मुख्यमंत्रीसाहेब, माझ्या आईला शोधून द्या, ओमची आर्त हाक...

अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह गायब आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा नातलगांना संशय आहे.

मुख्यमंत्रीसाहेब, माझ्या आईला शोधून द्या, ओमची आर्त हाक...

परभणी : चीनच्या सीमेनजिक देशाचं संरक्षण करण्यासाठी तैनात एका जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह गायब आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा नातलगांना संशय आहे.

उगवत्या सुर्याच्या प्रदेशात, अरूणाचलात मराठी जवानाच्या बाबतीत ही घटना घडली. दुर्दैव असं की देशभक्तीचे मोठ मोठी भाषण देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत एकानेही या जवानाची फिर्याद ऐकली नाही. 22 दिवस हिमालयाच्या दऱ्या खोऱ्यात आपल्या आठ वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन या जवानाने बायकोचा शोध घेतला. पण यश मिळालं नाही. या घटनेची माहिती मिळताच एबीपी माझाने पाठपुरावा सुरु केला.

नक्षलग्रस्त भागातून स्वप्नाचं अपहरण?

ओमची आई 22 दिवसांपूर्वी बाबाशी कुरबूर झाली म्हणून घराबाहेर पडली. सोबत एक वर्षाची आरा होती. तेव्हापासून आई कुठे गेली, असा प्रश्न सारखा ओमला सतावतोय. चिमुरड्याचे डोळे रडून लाल झाले आहेत.

ओमचे वडील अनिल अरुणाचल प्रदेशच्या टेंगा इथे भारतीय सैन्यात आर्टिलरी विभागात नायक आहेत. जवळच चीनची सीमा आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून अनिलचा बायको स्वप्नाशी खटका उडाला. त्यानंतर दीड तासांनी घराबाहेर पडलेल्या स्वप्नाचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. ओमला पाठीवर घेऊन अनिलने गावं पालथी घातली आहेत.

अनिल ज्या टेंगा भागात तैनात आहेत, तिथून आसामच्या तेजपूरपर्यंतचा भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना इथं घडतात. मानवी तस्करांचं मोठं जाळं या भागात आहे.

स्थानिक पोलिसांकडून सहकार्य नाही

अनिलच्या माहितीवर रेजिमेंटने पोलिसांत तक्रार नोंदवली. 400 जणांच्या फौजेने गुवाहटीपर्यंत शोध घेतला. हिमालयातल्या वाहत येणाऱ्या नदीपात्रात पैसे देऊन मच्छीमार उतरवले. पण अरूणाचलच्या स्थानिक पोलिसांनी मदतीचा हात दिला नाही. अनिलचे बंधू आणि मेहुण्यानेही महाराष्ट्रातून जाऊन अरूणाचलात शोध घेतला पण तोही व्यर्थ ठरला.

सध्या देशात देशप्रेमाचे गोडव गाणार मोदी सरकार आहे..फडणविसही देशप्रेमाची उदाहारणे देतात...पण चीनच्या सीमेलगत मराठी जवानाच्या बायकोच्या गायब होण्याची देवेंद्र फडणवीस, रणजित पाटील, हसंराज अहिर, निर्मला सीतारमण, किरण रिजूजी, नितीन गडकरी, अरूणाचलचे मुख्यमंत्री..कोणी कोणी दखल घेतलेली नाही.

सीसीटीव्ही फुटेज, हीच ओमची शेवटची आठवण

स्वप्ना गायब झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीचं मिलीटरी चेक पोष्टवरचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय. मिलीटरीने स्वप्ना आणि मुलीचे बॅनर तयार करून जागोजागी लावले आहेत. ओमसाठी सीसीटीव्हीतली आई हीच शेवठची आठवण उरली आहे. स्वप्नाचे सासू-सासरे, आई-वडील डोळ्यात पाणी आणून आठवणीने दिवसरात्र रडत आहेत.

एक महिन्याच्या सुट्टीवर आलेल्या अनिललाही वेड लागण्याची वेळ आली आहे. बायको आणि मुलीच्या आठवणीने शत्रूला चारीमुंड्या चित करण्याची छाती ठेवणारा हा जवान हतबल झाला आहे.

पाहा बातमीचा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV