महाराष्ट्राचा कमांडो धारातीर्थी, शहीद मिलिंद यांच्यावर नंदुरबारमध्ये अंत्यसंस्कार

मिलिंद हे मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या एनएसजी कमांडोच्या पथकात होते.

Son of Maharashtra soil IAF jawan Milind Khairnar martyred in J&K, last ride today

नंदुरबार: जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेला नंदुरबारचा वीरपुत्र मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर आज मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

खैरनार यांना चंदीगडमध्ये जवानांनी सकाळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव 9 वाजेपर्यंत ओझरला पोहोचेल, मग नंदुरबारमधील त्यांच्या मूळगावी बोराळेला रवाना होईल.

महत्त्वाचं म्हणजे मिलिंद हे मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या एनएसजी कमांडोच्या पथकात होते.

मिलिंद हे डिसेंबर 2002 मध्ये  हवाई दलात कमांडो म्हणून रुजू झाले होते,  सध्या  ते लष्कराच्या तुकडीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं.

काश्मीरमध्ये शहीद

काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झालेत. त्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबारच्या सुपुत्राचा समावेश आहे. मिलिंद किशोर खैरनार असं या वीरपुत्राचं नाव आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला.

Milind Khairnar

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे होते.

मुलगा शहीद झाल्याचा अभिमान

दरम्यान, मुलगा शहिद झाला याचा अभिमान आहे असं सांगताना शहीद मिलिंद खैरनार यांचे वडील आणि भावाला अश्रू अनावर झाले. वीरपुत्र मिलिंदच्या आठवणी त्यांनी एबीपी माझावर जागवल्या.

26/11च्या मुंबई हल्ल्यावेळी एनएसजी कमांडो असलेल्या मिलिंद यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं होतं. हवाई दलाचा कमांडो असलेल्या मिलिंदच्या आठवणी सांगताना कुटुंबियांना गहिवरुन आलं.

मिलिंद खैरनार यांचे वडील धुळे जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीतून निवृत झाले आहेत. नोकरीनिमित्त त्यांचे वडीव धुळ्यात असल्याने शहीद मिलिंद यांचे शिक्षणही धुळ्यातील एस. एस. व्ही. पी. एस. विद्यालयात झाले.

मिलिंद यांचे बंधू मनोज हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत.

मिलिंद खैरनार यांची ओळख

-मिलिंद किशोर खैरनार

-जन्म – १७ फेब्रुवारी १९८४

-एअर फोर्स कमांडो

-पश्चात – पत्नी, 2 लहान मुलं (वेदीका इयत्ता तिसरीत शिकते, एक वर्षाचा मुलगा कृष्णा)

-मूळगाव – बोराळे (जि.नंदुरबार)

-शिक्षण – धुळे जिल्ह्यातील साक्री इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये

-महाविद्यालयीन शिक्षण – एस.एस.व्ही.पी.एस. क़ॉलेज

-2002 ला एअरफोर्समध्ये कमांडो म्हणून रुजू

-वयाच्या 34 व्या वर्षी उत्तर कश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद.

  • पश्चात मुंबई पोलीसात कार्यरत असलेला भाऊ मनोज, निवृत्त झालेले वृध्द वडील आणि आई असा परिवार आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Son of Maharashtra soil IAF jawan Milind Khairnar martyred in J&K, last ride today
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

दोन रुपयांच्या पतंगासाठी 13 वर्षीय मुलाची हत्या
दोन रुपयांच्या पतंगासाठी 13 वर्षीय मुलाची हत्या

यवतमाळ : सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. अवघ्या 2

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/2017 एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अजित पवार
शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अजित पवार

मुंबई : शिवसेनेला लोकांची सहानुभूतीही हवीय आणि सरकारची उबही हवीय.

कोल्हापुरात गूळ खरेदी सुरु, चांगल्या दरामुळे शेतकरी समाधानी
कोल्हापुरात गूळ खरेदी सुरु, चांगल्या दरामुळे शेतकरी समाधानी

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या

अहमदनगर:  या पेटीत मगर आहे
अहमदनगर: या पेटीत मगर आहे

अहमदनगर: शेवगाव तालुक्यात बारा फूट लांबीची मगर पकडण्यास यश आलं.

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं
एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं

सोलापूर: पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी

एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण
एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण

नांदेड : ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी

धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी
धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी

धुळे : धुळ्यात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं दिवाळीच्या