स्पेशल रिपोर्ट: लाचखोरांचं भांडार - लाचलुचपत विभाग!

मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमनं लातुरात रात्रभर कारवाई करून आपल्याच विभागाच्या उपाधिक्षकांवर गुन्हा दाखल केला. डीवायएसपी सुरेश शेटकर हे छोटू गडकरी या मध्यस्थामार्फत आरटीओ कार्यालयातल्या अधिकाऱ्याकडे लाच मागत होते. आरटीओ अधिकाऱ्याने मुंबई एसीबीला कळवल्यानंतर, एसीबीने छोटू गडकरीला ताब्यात घेतलं.

स्पेशल रिपोर्ट: लाचखोरांचं भांडार - लाचलुचपत विभाग!

लातूर: लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईच्या पथकाने लातूरात कारवाई करून आज आपल्याचं उपअधीक्षकांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या घराच्या झडतीत 50 हजार रोख मिळाले. अजून कारवाई सुरु आहे. या करावाईमुळं काही सन्माननीय अपवाद वगळता राज्यभरातल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातचं खंडणीखोरांच्या टोळ्या कार्यरत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं.

प्रत्येक कार्यालयाकडून महिन्याकाठी लाचलुतपत अधिकाऱ्यांना ठराविक रक्कम दिली जाते. दोन वर्षापूर्वी राज्यातला अनोखा, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या विरोधातला पहिला आणि शेवटचा मोर्चा लातुरात निघाला होता हे विशेष.

लातुरच्या अधिकाऱ्याला मुंबई एसीबीने पकडलं

मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमनं लातुरात रात्रभर कारवाई करून आपल्याच विभागाच्या उपाधिक्षकांवर गुन्हा दाखल केला. डीवायएसपी सुरेश शेटकर हे छोटू गडकरी या मध्यस्थामार्फत आरटीओ कार्यालयातल्या अधिकाऱ्याकडे लाच मागत होते. आरटीओ अधिकाऱ्याने मुंबई एसीबीला कळवल्यानंतर, एसीबीने छोटू गडकरीला ताब्यात घेतलं.

खरं म्हणजे जिल्ह्या-जिल्ह्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातचं खंडणीखोरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत, असा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा रोष आहे. त्यामुळेच 30 मे 2015 रोजी लातुरात मोर्चा निघाला होता. लातूरच्या लाचलुतपतचे अधिकारी वारेमाप लाच मागत असल्याचा आरोप करत 26 कर्मचारी संघटनांनी हा ऐतहासिक मोर्चा काढला होता.

हा मोर्चा राज्यातला पहिला आणि शेवटचा ठरला होता. कारण हा मोर्चा ज्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात निघाला होता, तो अधिकारी दोनचं महिन्यांनी लाच घेताना एसीबीने पकडला होता.

या मोर्चानंतर लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक नरसिंग अंकुशकराव यांची बदली झाली. अकुंशराव गेल्यानंतर आलेले सुरेश शेटकर आज जाळ्यात सापडले.

त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी कोणत्या विभागातून किती लाच दिली जाते, याचा तपशील दिला होता. 26 संघटनांनी मिळून दिलेल्या यादीत ग्रामसेवक, तलाठी, सिव्हिल सर्जन, आरटीओ, रजिस्ट्री ऑफिस, राज्य आणि जिल्हा परिषदेचं कृषी विभाग असे दर होते.

पूर्वी लाचलुचपत विभागात बदली म्हणजे शिक्षा मानली जायची. म्हणून एससीबीत बदलीवर वन स्टेप प्रमोशन आहे. पण सध्या लाचलुचपतला बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात अशी वदंता आहे. खरं खोटं गृहमंत्रीच जानोत. पण आपल्याच सहकाऱ्याची पोलखोल करणाऱ्या मुंबईच्या पथकाचं मात्र अभिनंदन करायला पाहिजे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV