एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसबस आजही आगारात थांबून आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे.

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. दिवाळीच्या चौथ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

मुख्यमंत्री-परिवहन मंत्र्यांची भेट

संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जातेय : इंटक

राज्यातील विविध आगरातून कर्मचाऱ्यांना हकलवून दिलं जातंय, दमदाटी केली जातेय. सर्क्युलर काढून होमगार्ड्सची भरती करून एसटी काढल्या जात आहेत. कालच्या प्रस्तावानुसार आम्हाला 4 ते 5 हजार वेतन वाढ मिळेल, 12 ते 13 हजार रुपये पगारात आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत. इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे हीच आग्रहाची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, चर्चेसाठी बोलावलं तर आम्ही तयार आहोत, असं ‘इंटक’चे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले.

प्रशासनाचा कर्मचाऱ्यांविरोधात अध्यादेश

पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पंढरपुरात समोर आलाय.

संपादरम्यान विश्रामगृहात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क अर्धनग्न अवस्थेत प्रशासनानं बाहेर काढलं. संपावरील कर्मचारी एसटीच्या विश्रांतीगृहाचा वापर करत होते. यावेळी परिवहनचे अधिकारी अचानक विश्रांतीग़हात धडकले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांना सरळ विश्रांतीगृहाच्या बाहेर हाकललं.

तिकडे सोलापुरात एसटीच्या विभागीय कार्यलयाने आदेश काढलाय की, संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.

सोलापुरातील राज्य परिवहन विभागीय कार्यलयाने पत्रक काढून 11 आदेशच जारी केले आहेत.

रावतेंविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचा संताप

तिकडे धुळे शहरातमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोल केलंय. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तर कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलंय. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलंय.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली.

खासगी वाहतूकदारांची चंगळ

दरम्यान सध्या एसटीचा संप सुरु असल्यानं खासगी वाहतुकीला फायदा होतोय.प्रवासभाडं दुपटी-तिपटीनं वाढवण्यात आलंय. कोकणतही हीच परिस्थिती पाहायला मिळतेय.

माती लावून अभ्यंगस्नान

तर तिकडे नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान केलं. हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं  राज्यभर विश्रामगृहाचं पाणी, शौचालय, स्वच्छतागृह आणि वीज बंद केली आहे. जे कर्मचाऱी आहेत. त्यांना विश्रामग्रहातून बाहेर काढलं जातंय. त्याचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी  दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. बसस्थानकावर चिवडा फराळ खात या एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.

संबंधित बातम्या

ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी


"एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा" 

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार? 

प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक 

अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV