VIDEO : एसटी चालवताना चालक व्हॉट्सअॅपमध्ये गुंग

एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देतं. मात्र, याच महामंडळाचा चालक बस चालवताना मोबाईल फोनवर चक्क व्हॉट्सअॅप हाताळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

VIDEO : एसटी चालवताना चालक व्हॉट्सअॅपमध्ये गुंग

पैठण : एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देतं. मात्र, याच महामंडळाचा चालक बस चालवताना मोबाईल फोनवर चक्क व्हॉट्सअॅप हाताळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पैठण-जालना बसमध्ये हा प्रकार घडला आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. मात्र, चालत्या बसमध्ये चालकाला मोबाईलवर व्हॉट्सअॅप आणि फेसबूक पाहण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चालक महाशयांना चालत्या बसमध्येच फेसबुक, व्हॉट्सअॅप पाहण्याची लहर आली आणि बस सुरु असतानाच मोबाइल हाताळण्यास सुरुवात केली. यावेळी चालकाची कधी नजर रस्त्यावर तर कधी मोबाईलवर होती. सुदैवाने हा बसला कोणताही अपघात झाला नाही. मात्र, अशा बेफिकीरपणे बस चालवणाऱ्या चालकावर काही कारवाई होणार का? असा सवाल आता नागरिक विचारु लागले आहेत.

VIDEO :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ST Driver busy in Mobile when driving latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV