एसटी तुमचीच, कृपया मोडतोड करु नका, परिवहनमंत्र्यांचं आवाहन

भीमा कोरेगावसंदर्भात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांनी हे आवाहन केलं आहे.

एसटी तुमचीच, कृपया मोडतोड करु नका, परिवहनमंत्र्यांचं आवाहन

मुंबई : "एसटी बस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करुन सर्वसामान्य माणसांचं दळणवळणाचं साधन हिरावून घेऊ नका," असं आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आंदोलनकर्त्यांना केलं आह.

भीमा कोरेगावसंदर्भात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांनी हे आवाहन केलं आहे. एसटीचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्यापेक्षा प्रवाशांना होणारा त्रास अत्यंत विदारक असून कृपया आंदोलकांनी एसटीला लक्ष्य करुन त्याची मोडतोड, जाळपोळ करु नये," असे  आवाहन त्यांनी केलं.

अकोल्यात एसटी बंद, तर इतर ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात वाहतूक

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्तात एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व विभाग नियंत्रकांनी बसस्थानक, आगार इमारत, नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालये, विभागीय कार्यशाळा या सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त मागवून घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने बस वाहतूक सुरु ठेवावी, असंही म्हटलं आहे.

आंदोलनामुळे वेळोवेळी बदल होणारी माहिती बसस्थानकावर फलकावर प्रदर्शित करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

अकोला जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद

मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी अकोला जिल्ह्यात एसटी सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आज म्हणजे 2 जानेवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते उद्या (3 जानेवारी) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यातील बससेवा बंद राहिल. गैरसोय टाळण्यासाठी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: st is public property please do not damage it Appeals Diwakr raote
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV